मराठीला अभिजात दर्जा भेटल्याने त्याचा काय फायदा होणार आहे ? नक्की कोणत्या मराठीला अभिजात दर्जा भेटणार आहे ? ह्या आणि ह्या सारख्या प्रश्नांची तीव्रता वाढायला लागली आहे .
याबाबतीत तरी आपल्याला खेकड्याच्या वृत्तीतून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे . नाही ते फाटे फोडून प्रश्न उपस्थिती करण्यापेक्षा , काही लोकांनी केलेल्या प्रयत्नाने सर्वांच्या पदरी जे चांगले पडतेय ते लगेच स्वीकारून त्याचा येत्या काळात फायदा कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केले तर होणारा लाभ अधिक होईल. निष्कारण नवीन नवीन वाद निर्माण करून लोकांच्या मनात संदेह उत्पन्न करून निराशा पसरवायची आणि जे अगोदरच आतून विरुद्ध आहेत त्यांना पाठबळ द्यायचे हे उद्योग आणि वृत्ती बंद करण्याची आवश्यकता आहे .
(मराठी ही संस्कृत पेक्षा जुनी आहे,असावी ह्याचे पुरावे सबळ होत असून त्यामुळेच काहींच्या पोटात दुखू तर लागले नाही ना अशी शंका येतेय )
ज्यांचे प्रश्न भाबडेपणातून किंवा अज्ञानातून आलेले आहेत त्यांच्यासाठी खाली काही ठळक बाबी
______________________________________________________
‘अभिजात’ शिक्कामोर्तबानंतर..
(केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्याने काय फायदे होतील?)
> मराठी श्रेष्ठ राष्ट्रीय भाषा असल्यावर शिक्कामोर्तब.
> मराठीची जागतिक प्रतिष्ठा उंचावेल.
> मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारकडून राज्याला दरवर्षी किमान १00 ते ५00 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मिळेल.
> मराठीचा अभ्यास आणि या भाषेतील संशोधनाकरता मराठी अध्यासन स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून भरीव निधी उपलब्ध होऊ शकेल. असा दर्जा मिळवणारी मराठी ही तामीळ, संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळमनंतरची सहावी भारतीय भाषा असेल.
मराठी संस्कृतपेक्षाही जुनी?
मराठी ही संस्कृतोद्भव भाषा नाही. ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे हे १८८५ मध्ये राजारामशास्त्री भागवत यांनी दाखवून दिले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर, ल. रा. पांगारकर, शं. गो. तुळपुळे, अन फेल्डहाऊस, वि. भि. कोलते आदिंनी मराठीचे वय दीड हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे असंख्य पुरावे दिलेले आहेत. ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, विवेकसिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ आहेत असं आम्ही अडाणीपणाने सांगतो. एवढे श्रेष्ठ ग्रंथ बालवयात कोणतीही भाषा कशी प्रसवू शकतील? गाथा सप्तसती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे.
(प्रा. डॉ. हरी नरके यांच्या ब्लॉगवरून घेतलेली संपादित माहिती.)
__________________________________________________
मराठी संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांना आता कोणी प्रांतीक संकुचितपणा म्हणणार नाही कारण मराठी संवर्धन करणे आता महाराष्ट्र शासना बरोबर केंद्र शासनालाही बंधनकारक राहील . मराठी भाषाने कोणत्याही इतर भाषेतून जन्म घेतला नसून ती संस्करीत नाही ह्यावर पण शिक्कामोर्तब होईल .
शिवाय येत्या काळात आपण ह्या अभिजात दर्जाचा फायदा मराठीसाठी कसा जास्तीत जास्त करून घेऊ हे आपल्यावर राहील. सरकारची इच्छा असो वा नसो मराठी आवडणार्यांनी याचा योग्य लाभ उठवला तर फायदा निश्चितच होईल

No comments:
Post a Comment