जय शिवराय , मित्र हो ... !!
“माझी माणसं” ओळख माझ्या शिलेदारांची...!!
नाव
थोडंस वेगळा वाटत ना काय आहे हे “माझी
माणसं”
? ..तर
माझी माणसं हे प्रत्येकाने दुसर्याला संबोधून मारलेली प्रेमळ आणि आपुलकीची हाक आहे. कारण सुरवात हि नेहमी स्वतापासून झालेली केव्हाही चांगली..! यात
येत नाही तो स्वविषयीचा मीपणा ..!! असाच
मराठी माणूस जेव्हा एकत्र येतो तेव्हा बनतो ‘एक संघ’
!... आणि ‘एक
मजबूत परिवार’
...!! त्याचे ध्येय असते , ते
म्हणजे-- “ विचारांनी, ध्येयांनी ,
स्वकर्तुत्वाने श्रेष्ट, विकासाच्या वाटेने निरंतर चालणारा, मराठी संस्कृतीचे खरे मर्म जाणणारा आणि त्यांचे पालन करणारा, मराठी मातीची एकनिष्ठ असल्रेला, सोन्यासारखा मूल्यवान, हिऱ्यापेक्षा
हि मोडण्यास कठीण,
सूर्यासारखा लखलखता :तेजस्वी
असा साक्षात “श्री शिव छत्रपतीच्या व्यक्तिमत्वाशी” साधर्म्य असलेला,
शिवशंभू सारखी त्यागाच्या वृतीची
जाण असलेला” त्या त्या क्षेत्रातील प्रत्यक्ष “शिवाजी”
वा “संभाजी” असलेला प्रत्येक मराठी माणूस घडवण्याचा !!
विचार
करा, जर महाराज एक होते तरी त्यांनी मावळ्यांना सोबत घेऊन जे
स्वराज्य घडवले,
तसेच जर महाराजांसारखे चारीत्रावान असे अनेक निर्माण करता आले तर काय होईल ? त्यासाठी
आवश्यक आहे एकत्र येऊन निस्वार्थी मनाने निरंतर साथ देऊन काम करण्याची आणि
ध्येयासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहण्याची..! माझी माणसं परिवार निरंतर अश्या शिलेदार रुपी मावळ्यांच्या सहभागासाठी आतुर
राहील,
जो स्वेच्छेने प्रत्यक्ष कृतीच्या
आणि विकासाच्या या वाटेवर निरंतर अशी साथ देईल. कारण माझ्या माणसांचा ध्येय हे खूप लांबचे आणि कधीच न
संपणारे एक वास्तववादी सत्य आहे. यातून
जो मराठी समाज (गट)
तयार होईल त्याला समाजातील अनेक वाईट आणि दुष्ट प्रवृतीशी, वाईट विचारांशी लढण्यासाठी, तिला पराउक्त करण्यासाठी एक आंतरिक शक्ती मिळत राहील. जिचे
केंद्रस्थान हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात वसलेले असेल. एकतेने आणि निस्वार्थी मनाच्या या कार्यासाठी तसेच “मराठी अस्मितेसाठी एकत्र येऊन”,“ फक्त कृती करत रहा”
या उक्तीप्रमाणे कृती करत पुढे जायचे आहे. आपला सहभाग हा अमुल्य राहील. या
शिवकार्यात (शुभकार्यात)
सहभागी होऊन, आपण माझी माणसं परिवाराचे अनेक हात बनून ते ‘अधिकाधिक बळकट करून’, या ध्येयाकडे अत्याधिक
वेगाने अग्रेसर होत राहायचे आहे. तर या, आपले स्वागतच आहे.
“या
माझ्या माणसांना,
समशेरीसम धार असु दे,
धेय्यांवर अचूक वार असु दे....|
जी झेप घेत राहू आयुष्यात,
ती यशोशिखरांच्या पार असू दे…।“
धेय्यांवर अचूक वार असु दे....|
जी झेप घेत राहू आयुष्यात,
ती यशोशिखरांच्या पार असू दे…।“
!! जय जय
शिवराय !!
आव्हाहन ... पुस्तक दानाचे !
“जागतिक मराठी भाषा दिवस” हा एक एवेंट म्हणून आम्ही साजरा करत आहोत, जो अशीच मराठी साहित्यांची पुस्तके, ग्रंध, मासिके जी वाचून झाली आहेत, ते ते आपण दान स्वरुपात " माझी मानसं " परिवाराला दिल्यास त्यांचे
एक प्रदर्शन मुंबई येथे भरवण्यात येईल. त्या सर्व पुस्तकांचे मराठी
भाषा दिनानिमित समाजाला (सामान्य माणसाला) वाचनानिमित दान म्हणून दिली
जातील. जेणेकरून खर्या अर्थाने
मराठी भाषेचा हा दिवस आपण साजरा करू शकतो. मराठी भाषेचा प्रसार
करू शकतो. जी पुस्तके दान म्हणून
घेतली आहे, आणि जेन्हा ती वाचनाकर्ताला
दिलेली आहेत त्या दोघांची हि नोंद ठेवली जाईल. आणि पुन्हा हि पुस्तके गोळा
करून ती पढे दुसर्या कोणाला वाचनासाठी देण्यात येतील. अशी क्रिया चालत राहील. त्यासाठी या ज्ञान दानाच्या आणि मराठी
भाषेच्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याकडील जीजी वाचण्यायोग्य अशी
पुस्तके, मराठी साहित्य, ग्रंध , किवा मासिके आपण दान स्वरुपात देऊ इच्छितात त्यांनी माझ्या
माणसांच्या स्वयंसेवक शिलेदारांना संपर्क करून अवश्य द्यावीत. – जय शिवराय !
No comments:
Post a Comment