कार्य



ज्ञान दान कार्यक्रम ( ओळख )
सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञाच्या युगात करमणुकीसाठी टी.व्हि., विविध वाहिन्या, केबल,, इंटरनेट, संगणक, ,स्मार्ट मोबाईल,, ऑडीओ / व्हिडीओ गेम्स,, सीडी--डीव्हीडी प्लेअर,, आयपॉड,, ट्याब,, -बुक्स, एफ.एम. रेडीओ इत्यादी.. साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागल्याने आजची तरुण पिढी मराठी पुस्तके वाचत नाही., एकूणच सर्वच लोकांची वाचनाची आवड कमी झालेली आहे. त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमानद्व्यारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या या आधुनिक युगात ग्रंथालयाचे सभासद होऊन पुस्तके वाचने ही परंपराच लुप्त / नष्ट होत चाललेली आहेयात आम्हाला ग्रंथालयाची जागा घ्यायची नाही तर ग्रंधालयचं लोकांपर्यंत नेऊन ठेवायचा आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. त्या निमिताने तुम्हाला मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक पुस्तके, ग्रंध, वेगवेगळी मासिके (लोकोपयोगी फक्त), लहान मुलांसाठीची पुस्तके, जेजे वाचून झालेले आहेत आणि किवा सध्या कपाटातील एका कोपरयात नुसतीच धूळ खात पडली आहेत,  ते ते  सर्व अगदी निस्वार्थीपणे, जे समाजाला (सामान्य माणसाला) ज्ञान प्राप्त करून मराठी साहित्य लोकांपर्यंत अधिकाधिक व्यापक पद्धतीने पोहचू शकेल. अश्यांचा एक संग्रह आमच्याकडे जमा करू शकतात. ती ती सर्व आम्ही सामान्य माणसांना वाचनानिमित ठराविक वेळेसाठी दान म्हणून देणार आहोत. काही पुस्तकं विचार करायला लावणारी तर काही विचार बदलायला लावणारी असतात. चांगल्या पुस्तकांनच्या वाचनाने आपल्या संपूर्ण जिवनाला एक वेगळे वळण मिळते. कधीकधी न वाचलेल्या गोष्टी आपण एखाद्या पुस्तकात वाचतो आणि आपल्या  विचारांमध्ये क्रांतिकारक असा बदल घडतो. यातून वाचनकार्त्याच्या विचारांची निश्चितपणे वृद्धी होऊन त्याचा सर्वाधिक फायदा त्या व्यक्तीला आणि परीणामस्वरूप संपूर्ण समाजाला निश्चितच होत राहतो.
नक्कीच यात निस्वार्थी सहभाग अपेक्षित आहे. कारण पुस्तकेहि वाचानकर्त्याच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि तेच दान म्हणून कायमचे देऊन टाकायचे? त्याचे काय होईल, कसे होईल?? नाना शंका मनात येत असतील. पण माझी माणसं परिवारआपल्याला आश्वस्थ करू इच्छितो कि आपले हे दान व्यर्ध जाणार नाही. आपले हे दान सामान्य लोकांना ज्ञानार्जनाचेच काम करत राहतील, आणि त्यावरील पुण्याचा अधिकार फक्त दान कर्त्याचा राहील. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जे जे लोक स्व इच्छेने यात सहभागी होतील त्यांचे आम्ही शतशः ऋणी असणार आहोत. तुमची नोंद हि यात निश्चीत पणे ठेवली जाईल.




ज्ञान दान कार्यक्रम रूपरेषा ( थोडक्यात )
जागतिक मराठी भाषा दिनाचे औत्सुक्य साधून यावेळी प्रथमच समाजासाठी माझी माणसं एक छोटासा उपक्रम राबवत आहोत, त्याचे नाव आहे मराठी साहित्य आणि पुस्तके दान सोहळा सण २०१५
कार्यक्रमाचे नियोजन हे पूर्णतः परिवारातील कोर कमिटी सभासदांकडे राहील. आपणास काही सुचवायचे असेल तर माझ्या माणसाच्या दिलेल्या यादीतील शिलेदारांशी अथवा माझी माणसंया फेसबुक पेज वर आपली प्रतिक्रिया थोडक्यात मांडू शकता. तसेच आपल्या थोडक्यात माहितीसाठी वरील उपक्रमातील येणारे प्रारंभिक टप्पे संशिप्त स्वरुपात मांडत आहोत..
१.     जागतिक मराठी दिनाच्या अगोदर अधिकाधिक लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमानमार्फत  पोहचून मराठी साहित्य गोळा करणे. (यात कार्यक्रमाचा प्रसिद्धी काळ समाविष्ट आहे)
२.     मिळालेली सर्व पुस्तके शक्य असतील तेव्हा किवा महिनाअखेरीस मध्य मुंबई (विक्रोळी) येथे गोळा करून त्यांचे नीट संगोपन (बायडिंग आणि त्यावर मूळ पुस्तक देणार्याचे नाव, माझी माणसं चा लोगो, क्रमांक अधींची नोंद आधी ) केले जाईल. आणि वेगवेगळ्या प्रकारांत विभागणी केली जाईल.
३.     कार्यक्रमाचा हा मुख्य टप्पा असेल ज्यामध्ये, उदघाटन समारोह, पुस्तक प्रदर्शन, लोकांना मार्गदर्शन, आणि पुस्तके वाचून परत करण्यासाठीचे आवाहन करणारे एक माहितीपत्रक देयात येईल. आणि त्यातील ज्यांना दान म्हणून पुस्तक हवी आहेत अश्या लोकांची यादी करणे, आणि त्यांची नोंद ठेऊन त्याच दिवशी संद्याकाळी कार्यक्रम समारोप वेळी किवा शक्य नसेल तर दुसर्या दिवशी त्यांनी दिलेल्या ठराविक वेळेपुरता पुस्तके वाचनासाठी देण्यात येतील...
४.     कार्यक्रमाचे मूल्यमापन करणे आणि भविष्यासाठीचे नियोजन करणे 


वाचनात येणाऱ्या अडचणी शंका-कुशंका किवा नकारार्थी विचार आणि मार्गदर्शन
१ .आपल्या धकाधकीच्या दैनंदिनीत स्वत:साठी वेळ काढणं तसं कठीणच असतं. त्यात दिवसभराच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पुस्तकं वाचण्याची इच्छा असूनही अनेकांची वाचनाची इच्छा अपूर्णच राहते  परंतु आपण हळूहळू का होईना प्रयत्न केला तर निश्चिंत वेळ हि आपसूकच मिळेल , कारण वाचनाची गोडी हि अवीट अशीच असते. काही पुस्तकं विचार करायला लावणारी तर काही विचार बदलायला लावणारी असतात. पण जर ती  वाचलीच नाही तर नुकसान हे सर्वस्वी आपलेच.. हा विचार मनी ठाम रुजवावा कारण आपण जे पेरणार तेच पुढे उगवणार, म्हणजे वाचनसंस्कृती आपण स्वत: जपली तर आपली पुढची पिढी हि आपल्याच पावलावर पाउल ठेऊन हीच संस्कृती अधिक पुढे नेऊ शकेल.
२. माणसानं बोललं पाहिजे, असं सगळ्यांनाच नेहमी वाटत. पण हेही नक्की आहे कि ऐकत राहावं असं काही, किंवा ऐकावंच लागेल असं काही, आपण बोलावं. खरं तर आपल्याला विषयाची वानवा नसतेच पण ज्याच्याशी बोलायचं व ज्याच्यावर बोलायचं त्याचे सूर जुळावे लागतात. खूप आतून बोलायचं म्हणाल तर तेवढं आत काही रुतणारं, सलणारंही असावं लागतं. त्यासाठीच वाचन महत्त्वाचे आहे, तीच संधी पुस्तकदानातून इतरांसाठी देणार आहोत.
३. पुस्तकेहि वाचानकर्त्याच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि तेच दान म्हणून कायमचे देऊन टाकायचे? त्याचे काय होईल, कसे होईल ?? नाना शंका मनात येत असतील. पण माझी माणसं परिवार आपल्याला आश्वस्थ करू इच्छितो कि आपले हे दान व्यर्ध जाणार नाही. आपले हे दान सामान्य लोकांना ज्ञानार्जनाचेच काम करत राहतील, आणि त्यावरील पुण्याचा अधिकार फक्त दान कर्त्याचा राहील.
४. समाजातील अशुद्ध विचारांची घाण साफ करण्यासाठी  पद्धत तीच, तळमळ तीच. समाज सुधारला पाहिजे. गैरसमजुती, अंधश्रद्धा, बलात्कार का होतात ? गुन्हा का घडतो कारण विचार बदलण्याची आणि शुद्ध होण्याची गरज हि निर्माण झाली  आहे , हातात शस्त्र आहे ते म्हणजे “ पुस्तकी ज्ञानाचे ” बाणाही तोच आहे शिवरायाशी एकनिष्ठ असण्याचा कारण उर्जेचा स्रोत जर महाराज स्वतः असतील तर ध्येयाकडे अगणिक वीर दौड नक्कीच करतील. यात  माझी माणसं परिवाराला झोळीत घ्यायचं काहीच नाही, फक्त द्यायचं आहे. शिवाजी महाराजांचे मराठी जनतेसाठीचे खरे स्वप्न चिरकाल अबाधित राखायचे आहे.
.

No comments:

Post a Comment