" मी "
" मी " या एका शब्दाभोवती अवघा संसार फिरतो असे मला लहान पणा पासून
वाटे. वडिलांना " मी " या शब्दाचा तिटकारा फार. ते नेहमी हेच सांगत आले कि "
मी " बोलू नये. पण " मी " या शब्दाभोवतीची वलय माझ्या भोवती नेहमीच
राहिले. वडिलांनी सांगितलेला गर्भार्थ मी घेतला आणि शब्दश : अर्थ टाळला.
हळू हळू आई वडील यान बरोबरच्या जगाची व्याप्ती वाढत गेली. भावू , बहिण ,
मित्र , शिक्षक असंख्य नवीन नाती बनत गेली. प्रत्येकाच्या सुरुवातीची एक
कारण होते. काही नात्यांबाबत ते कारण धुसर होत गेले आणि ती नाती अस्पष्ट
होत गेली. आजवर कधी त्याचा कमीपणा भासला नाही. कारण काळ नेहमीच तुम्हाला
पुढे ढकलत असतो.
आई वडिलांच्या
मायेखालाचे पाखरू हवेत भरारी मारू लागले आणि समाजाच्या असमानतेचे चटके
अंगाला जाणवू लागले. जन्मतः जोडलेली नाती आई वडिलांनी जबरदस्ती , कधी गोड
बोलून टिकवून घेतली आणि जगाशी नाते कसे टिकवावे हे सुचवून दिले. तिथे मी
होतो पण त्या मी पानामध्ये सर्व होते. माझ्या त्या " मी " मुळेच ते सर्व
होते आणि त्या " मी " साठीच हे सर्व घडत होते. फक्त हा " मी " वडिलांना
तिटकारा असलेल्या " मी " पेक्षा वेगळा होता.
मला नेहमीच हृदयाचे ऐकायला आवडते. ते नेहमी खरे बोलते. वयाच्या एका
टप्प्यात प्रेमात पडलो आणि जोडलेल्या या नात्याने मला या अनोळखी जगाची एक
प्रेमळ बाजू दाखवली. कोण कुठली ती येते आणि माझं सर्वस्व बनते. माझ्यासाठी
ती तिचे जे सर्व होते ते सोडून जे माझे होते ते तिचे मानते आणि मला जगाचा
एक नवीन चेहेरा दिला. हेच तेच अनोळखी आणि असमान जग होते ज्याने मला माझ्या
आयुष्याचे नाते दिले. आता माझा या जगातला खरा प्रवास सुरु झाला आहे जिथे
मला अजून अशी नाती हवी आहेत जी माझी आहेत.
या प्रवासाच्या सुरुवातीच्याच टप्प्यात जाणवले कि मी एकटा नाही या
प्रवासात ज्यांचा अंतिम पल्ला माझा आहे तोच आहे. हे सर्व मीच आहेत जे मी
शोधत आहेत तेच शोधात आहे. या अनोळखी जगात आपले कोणी, स्वतःच्या बनवलेली आणि
जोपासलेली ती प्रेमळ नाती, एकमेकांसाठी आपलेसी वाटणारी ती प्रेमळ मने,
आम्ही एकमेकानांच शोधत होतो पण एकमेकांपासून दुरावले होतो.
जीवन फार सुंदर आहे. ते अधिक सुंदर करण्यासाठी जगावे. अधिक मोठ्या
स्वरूपात जगावे आणि आपले जीवन सुंदर करताना एक दिवस सर्वांचे जीवन सुंदर
करावे. जोवर मी माझ्या " मी " चा शोध घेत नव्हतो तोवर मी सर्वांसोबत
असूनसुद्धा एकटा होतो. जेव्हा वडिलांचा " मी " समजलो तेव्हा सर्वांमधील "
मी " अनुभवलो. आजवरच मी आता सर्वांचा " मी " झालो आणि माझ्या सर्वांचा
मिळून बनली , " माझी मानसं "
" माझी मानसं " जी माझी आहेत. आणि हाच " मी " या प्रत्येक कुटुंबाचा " मी " आहे.